दरवर्षी मल्लखांबाच्या विविध स्पर्धा आयोजित करून खेळाडूंना मल्लखांब क्षेत्रातून जस्तीतजास्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना काम करत आहे. संघटनेच्या स्थापनेपासून गेल्या ३० वर्षांमध्ये संघटनेने एक द्रोणाचार्य पुरस्कार, एकअर्जुन पुरस्कार व बारा श्री शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू/प्रशिक्षक घडवले आहेत.
मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेची स्थापना दिनांक २० नोव्हेंबर १९९४ रोजी झाली असून मुंबई उपनगरातील मल्लखांब खेळाचे नियमन करणारी ही अधिकृत संघटना आहे. मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना ही गेल्या ३० वर्षाहून अधिक काळ कार्यरत असून सध्या ७२ संस्था संघटनेशी संलग्न आहेत व या संस्थांमध्ये अंदाजे १००० खेळाडू मल्लखांबाचा नियमित सराव करत आहेत.