सुविद्या प्रसारक संघ व सुविद्या डिग्री कॅालेज आणि मल्लखांब लव यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या मान्यतेने, कै.दत्ताराम दुदम सरांच्या स्मरणार्थ ४ थी अजिंक्यतारा चषक निमंत्रित मल्लखांब स्पर्धा दिनांक ३ व ४ मे २०२५ रोजी योजना विद्यालय, बोरीवली (पूर्व) येथे आयोजित करण्यात आली होती.
सदर स्पर्धेत ६, ८, १०, १२, १४, १६ व १८ वर्षाखालील मुले व मुली तसेच सलग दुसऱ्या वर्षी पॅरा मल्लखांबाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामध्ये, जवळपास ५०० खेळाडूंनी सहभाग घेतला. तसेच राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, संघटनेचे पदाधिकारी, पंच, प्रशिक्षक, मार्गदर्शक, आयोजक आणि स्वयंसेवक त्याचप्रमाणे शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि अन्य मान्यवर यांनी देखील कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. विजेत्यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रमाणपत्रे, पदके, ट्रॅाफी प्रदान करण्यात आल्या तसेच सर्व खेळाडूंना कै.दत्ताराम दुदम सरांचे पदक देऊन गौरविण्यात आले.
मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेचे सचिव आशिष देवल यांच्या नेतृत्वाखाली चमूने उत्कृष्ट कामगिरी पार पाडली. सर्व व्यवस्था, स्थापनेपासून ते अंमलबजावणीपर्यंत, अत्यंत कौशल्याने करण्यात आल्या, ज्यामुळे हा कार्यक्रम नियोजित वेळेत यशस्वीपणे पार पडला. या कार्यक्रमाचे सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष श्री.महादेव रानडे, कै.दत्ताराम दुदम सरांच्या पत्नी श्रीम.स्मिता दुदम मॅडम तसेच मान.आमदार श्री.संजय उपाध्याय व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष श्री.सिद्धेश कदम, मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष श्री.करुणाकर शेट्टी, माजी नगरसेविका श्रीम.प्रतिभाताई गिरकर, माजी नगरसेवक श्री.शिवा शेट्टी यांनी भरभरून कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
भारत सरकारच्या फिट इंडिया मूव्हमेंट अंतर्गत भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI) २३ मार्च २०२५ रोजी अक्सा बीच, मालाड येथे मल्लखांब स्पर्धा आणि इतर विविध क्रीडा स्पर्धांचे यशस्वी आयोजन केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना आणि संघटनेचे सचिव आशिष देवल यांच्या नेतृत्वाखालील चमूने उत्कृष्ट कामगिरी पार पाडली. सर्व व्यवस्था, स्थापनेपासून ते अंमलबजावणीपर्यंत, अत्यंत कौशल्याने करण्यात आल्या, ज्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला.
तसेच, देवांशी माळी यांनी SAI अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधून दिलेल्या महत्वपूर्ण सहकार्याबद्दल त्यांचे विशेष आभार. त्यांच्या योगदानामुळे ही स्पर्धा सुरळीत पार पडली आणि मल्लखांब खेळाच्या प्रचारास मदत झाली.
या स्पर्धेत एकूण ९० खेळाडूंनी खुल्या गटात (मुले आणि मुली) सहभाग घेतला. तसेच १३० हून अधिक अधिकारी, पंच, प्रशिक्षक, मार्गदर्शक, आयोजक आणि स्वयंसेवक यांनी कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवला. या स्पर्धेला भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसह, मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष करुणाकर शेट्टी आणि सचिव आशिष देवल यांची उपस्थिती लाभली. तसेच शिवछत्रपती पुरस्कार विजेते आणि अन्य मान्यवर देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. विजेत्यांना त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रमाणपत्रे आणि पदके प्रदान करण्यात आली.
श्री पार्लेश्वर व्यायामशाळा तसेच मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना यांच्या मान्यतेने (मुंबई उपनगर जिल्ह्याकरीता) आयोजित २४ वी पार्ले महोत्सव मल्लखांब स्पर्धा २०२४-२५ दिनांक २५ व २६ डिसेंबर २०२४ रोजी पार पडली. सदर स्पर्धेत खुल्या वयोगटातील (मुले व मुली) सुमारे १६० खेळाडूंनी त्यांचे कौशल्य सादर केले तसेच पदाधिकारी, पंच, प्रशिक्षक, मार्गदर्शक, कार्यकर्ते, स्वयंसेवक अशाप्रकारे जवळपास २०० जण सहभागी झाले होते. सदर स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे मान. मुख्यमंत्री, श्री.देवेंद्र फडणवीस, स्थानिक मान.आमदार, श्री.पराग अळवणी, माजी मान.नगरसेविका, श्रीम.ज्योती अळवणी, पद्मश्री पुरस्कार विजेते श्री. उदय देशपांडे, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते तसेच मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेचे कार्याध्यक्ष श्री.गणेश देवरूखकर व मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेचे सचिव श्री. आशिष देवल, अर्जुन पुरस्कार व श्रीशिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू तसेच श्री पार्लेश्वर व्यायामशाळा संस्थेचे पदाधिकारी, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सदर स्पर्धेतील विजेत्या खेळाडूंना प्रमाणपत्र, मेडल व आकर्षक पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद, मुंबई उपनगर द्वारा तसेच मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना व बीमा नगर एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आंतरशालेय राज्यस्तरीय मल्लखांब स्पर्धा २०२४-२५ दिनांक २८ व २९ नोव्हेंबर २०२४ रोजी पार पडली. सदर स्पर्धेत महाराष्ट्रातील ८ विभागातील १९२ खेळाडू तसेच अधिकारी, पंच, प्रशिक्षक, मार्गदर्शक, कार्यकर्ते, स्वयंसेवक अशाप्रकारे जवळपास ३०० जण सहभागी झाले होते. सदर स्पर्धेसाठी भारतीय जनता युवा मोर्चा मुंबई अध्यक्ष – तेजिंदर सिंह तिवाना, पद्मश्री पुरस्कार विजेते – उदय देशपांडे, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते – गणेश देवरुखकर, उपसंचालक क्रीडा व युवक सेवा संचालनालय मुंबई क्रीडा विभाग – नवनाथ फरताडे, मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेचे अध्यक्ष – करुणाकर शेट्टी, आशिया मल्लखांब महासंघ महासचिव – अभिजीत भोसले, जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई उपनगर – वर्षा साळवी, महाराष्ट्र हौशी मल्लखांब संघटनेचे सदस्य – ॲड. संजय केकाण, मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेचे सचिव – आशिष देवल, बीमा नगर एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष – पराग महाजन, मल्लखांब लव या संस्थेची संचालिका संचिता देवल, अर्जुन पुरस्कार/श्रीशिवछत्रपती पुरस्कार विजेते खेळाडू इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २९ सप्टेंबर २०२४ रोजी पोयसर जिमखाना, कांदिवली (प.) येथे पार पडली. सदर सभेसाठी विविध मान्यवर, मुंबई उपनगर जिल्ह्यातील पदाधिकारी, संलग्न संस्थांचे प्रतिनिधी, आजीव सदस्य असे जवळपास १०० जण उपस्थित होते.
सदर सभेसाठी विविध मान्यवर, मुंबई उपनगर जिल्ह्यातील पदाधिकारी, संलग्न संस्थांचे प्रतिनिधी, आजीव सदस्य असे जवळपास १०० जण उपस्थित होते. सदर सभेत मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांबाबत माहिती देण्यात आली व चर्चा सुद्धा करण्यात आली. मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या नवीन वेबसाइट, चिन्ह, विविध उपक्रमांचे सर्वांनी कौतुक केले व संघटनेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. सभेमध्ये मल्लखांब खेळातील द्रोणाचार्य पुरस्कार विजेते श्री. गणेश देवरूखकर आणि दुसऱ्या विश्व मल्लखांब स्पर्धेतील विजेते कु. अक्षय तरळ, कु. जान्हवी जाधव, कु. रुपाली गंगावणे यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, मल्लखांबपटुंना प्रोत्साहन देण्यासाठी कै. दत्ताराम दुदम सरांच्या स्मरणार्थ यावर्षीपासून उभरत्या खेळाडूंना गौरविण्यात येणार असून सन २०२३-२४ या वर्षामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल कु. विराज आंब्रे, कु. तन्वी दवणे यांचा गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे, मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेला देणगी देणाऱ्या मल्लखांब प्रेमींचा सन्मान करण्यात आला व त्यांना धन्यवाद दिले. उपस्थित सर्व मान्यवर, प्रतिनिधींचे आभार मानून राष्ट्रगीताने सभेची सांगता करण्यात आली.
दिनांक १५ जून २०२४ रोजी मल्लखांब दिनानिमित्त मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या अधिकृत वेबसाइटचे अनावरण करण्यात आले.
तसेच, मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या नवीन चिन्हाचे (Logo) अनावरण करण्यात आले.
त्याचप्रमाणे, मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या प्रयत्नातून, जगप्रसिद्ध प्रतिष्ठित दिनदर्शिका कालनिर्णय च्या सन २०२५ च्या आवृत्तीमध्ये १५ जून ही तारीख आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन म्हणून नमूद करण्यात आली आहे. यामुळे, मल्लखांबा सारखा प्राचीन व पारंपरिक भारतीय खेळ अजून जास्तीत जास्त लोकाभिमुख होण्यास नक्कीच मदत होईल.