जागतिक मल्लखांब दिनानिमित्त मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेचे नवीन संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून सर्व सदस्यांचे व समर्थकांचे अभिनंदन !
15 जून 2024.
जागतिक मल्लखांब दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मुंबई उपनगर जिल्हा
मल्लखांब संघटना
मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटना (MUMS) मल्लखांब खेळाला प्रोत्साहन देणारी आणि त्याचे संवर्धन करणारी मुंबई उपनगरातील प्रमुख संस्था आहे. उपनगरात मल्लखांब खेळ वाढवण्यामध्ये व त्याचा विकास करण्यामध्ये MUMS महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
MUMS ने मुंबई उपनगरातील अनेक तरूणांना स्पर्धा, प्रात्यक्षिके, शारिरीक व्यायाम, योगासने, इत्यादी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रेरीत केले आहे. संघटना या पारंपारीक खेळाचे जतन करण्यासाठी व या खेळाच्या वाढीसाठी कटिबद्ध असून मल्लखांबाचा देशात, जगात प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रयत्नशील आहे.